‘ही शेवटची संधी आहे तुम्हाला’; जरांगेंचं नेत्यांना धडकी भरवणारं वक्तव्य

On: May 10, 2024 2:05 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करताना दिसत होते. मात्र सध्या त्यांनी लोकसभा निवडणुकीला घेऊन आंदोलन आणि उपोषणाला स्थगिती दिली आहे. मात्र असं असलं तरीही त्यांचे मराठा समाजाला घेऊन आंदोलन सुरू आहे. बीडमध्ये त्यांनी सभा घेतली आणि सभेला संबोधित करत असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“एकीची धास्ती त्यांना लागते”

अंबोरा येथील एका सभेला मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा ताकदीने एकत्र आला आहे. एकीची धास्ती त्यांना लागते. एकीची भीती एवढी बसली आहे. चांगल्या चांगल्याने गुडघे टेकले आहेत. मराठा एक झाल्याने लोकसभेचं पाच टप्प्यात मतदान झालं. हाच मराठ्यांचा विजय असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता. आमच्या माय लेकीची डोकी फोडली. मोदी सध्या गोधड्या घेऊन मुक्कामी आहेत. मी कोणालाही मत देण्यासाठी काहीही बोललो नाही, असं त्यांनी बोलत असताना स्पष्ट केलं. यावेळी भाजप नेत्यांवर त्यांनी तोंडसुख घेतलं आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांना भाषणातून लक्ष केलं. कोल्हापूर चंद्रकांत पाटील तेरे नाम खेकड्याची औलाद म्हणून त्यांच्यावर जरांगेंनी हल्लाबोल केला आहे. फडणवीस साहेब तेरे नामला समजावून सांगा, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याने नेत्यांना धडकी

मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याने धडकी भरली आहे. याआधीच्या काही सभेमध्ये त्यांनी मराठ्यांना विरोध करणाऱ्यांना असं पाडा की पाच पिढ्या उठल्या नाही पाहिजेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. दुसऱ्यांसाठी तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका नाहीतर मराठा तुमच्या कपाळाला गुलाल लागू देणार नाहीत.

News Title – Manoj Jarange Patil Big Statement At Ashti Beed

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! ‘या’ बँकेत तुमचं खातं असल्यास होणार बंद

सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना थेट ऑफर

“पक्ष बदलायला कसं भाग पाडलं?”; शिंदे गटात गेलेल्या रवींद्र वायकरांनी सगळं सांगून टाकलं

गुड न्यूज! अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या किंमती

प्रियंका चतुर्वेदींनी भरसभेत केली मोदींची नक्कल, म्हणाल्या…

Join WhatsApp Group

Join Now