छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे परत एकदा उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही येत्या चार जूनपासून उपोषणाला बसणार आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे.
मनोज जरांगेंची मोठी घोषणा
येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत. चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सांगितलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचंही आम्ही आवाहन केलेलं नाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचं आवाहन केलं. कोणाला पाडायचं हे मराठा समाजाल कळालेलं आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले.
Manoj Jarange | “…तर मी मैदानात जाणार”
फडणवीस शिंदे यांना आवाहन आहे की आमचा हक्काचं आम्हाला द्या. दिल नाही तर 288 मध्ये आम्ही सर्व जाती धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहे, असंही जरांगे म्हणालेत. मैदानातच मी राहणार आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात जाणार आहे दिले तर राजकारण माझा मार्ग नाही, असंही जरांगेंनी सांगितलं.
जरांगे पुढे म्हणाले की ” राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांना माझ्या मागे लागायची काही गरज होती का? देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे. त्यांनी महिलांवर अन्याय अत्याचार केले. चंद्रकांत पाटील म्हणतात की मी स्वतः मला प्रमाणपत्र द्या असे मागितलं होतं मला दिले नाही म्हणून मी असं करतो असं म्हणतो असं त्यांचं म्हणणं आहे.
फडणवीस यांनी असे लोक सांभाळण्यात आणि यामुळे मोदी यांच्यावर ही वेळ आली आहे. यामुळे मोदींना सोलापूर मध्ये तीन सभा घ्याव्या लागल्या”
महत्त्वाच्या बातम्या
“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा
अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलं
‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले
‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण






