Crime l आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाण्याचे विकृत कृत्य करणाऱ्या एका तरुणाला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे, जी मुंबई उच्च न्यायालयानेही (Mumbai High Court) कायम ठेवली आहे. २०१७ मध्ये कोल्हापुरात (Kolhapur) ही धक्कादायक घटना घडली होती. यल्लमा रामा कुचकोरवी (Yallamma Rama Kuchkorvi) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे, तर सुनील कुचकोरवी (Sunil Kuchkorvi) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
घटनाक्रम आणि न्यायालयाचा निर्णय :
२८ ऑक्टोबर २०१७ रोजी कोल्हापुरात ही हृदयद्रावक घटना घडली. कोल्हापूर सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये सुनील कुचकोरवीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली. ‘आरोपीची तुलना कसायाशीही करता येऊ शकणार नाही, हे नरभक्षणाचे प्रकरण आहे’, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Crime l आईचा खून आणि अवयवांचे भक्षण :
यल्लम्मा या कंगवा, पिना विकून घर चालवत होत्या. त्यांचा मुलगा सुनील हा काहीच कामधंदा करत नव्हता. तो दारूच्या आहारी गेला होता. मुलाची दारू सुटावी म्हणून यल्लम्मा त्याला सतत ओरडत असत, मात्र त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. २८ ऑगस्टच्या दिवशी सुनीलने आईकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
भांडणादरम्यान सुनीलने जन्मदाती आईचा धारदार चाकूने खून केला. इतकेच नव्हे, तर त्याने आईच्या डोक्यावर वार करत आधी मेंदू काढला. नंतर आईची किडनी, लिव्हर आणि इतर अवयव बाजूला केले. त्यानंतर ते अवयव शिजवून खाल्ले.
शेजाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना धक्का बसला. आरोपी सुनील तेव्हा आईचे काळीज काढून शिजवून खाण्याच्या बेतात होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले.






