ममता कुलकर्णीने सोडला साध्वीचा अवतार? मॉडर्न लूक पाहून भुवया उंचावतील; पाहा VIDEO

On: March 19, 2026 4:13 PM
Mamta Kulkarni
---Advertisement---

Mamta Kulkarni | एकेकाळची प्रसिद्ध बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) पुन्हा एकदा आपल्या बदललेल्या रूपामुळे चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी कुंभमेळ्यात भगवी वस्त्रे परिधान करून साध्वीच्या रूपात दिसलेल्या ममताने आता अचानक आधुनिक पेहराव करून सर्वांना चकित केले आहे. तिच्या मॉडर्न लूकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

साध्वी ते मॉडर्न लूक: ममताचा बदललेला अंदाज

ममता कुलकर्णीने आपल्या अध्यात्मिक प्रवासाला काही काळ बाजूला ठेवून पुन्हा एकदा ग्लॅमरस जगात पाऊल ठेवल्याचे चित्र दिसत आहे. ऋतू बदलतात तसा आपला पेहराव बदलणाऱ्या ममताचा एक नवीन व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, त्यात ती अत्यंत स्टायलिश अंदाजात वावरताना दिसत आहे.

या ताज्या व्हिडिओमध्ये ममताने आपले भगवे कपडे आणि चंदनाचा टिळा त्यागून आधुनिक पद्धतीचा जंपसूट (Jumpsuit) परिधान केला आहे. मोकळे केस आणि डार्क गॉगल (Goggles) लावलेली ममता आपल्या काही खास मैत्रिणींसोबत गोवा दौऱ्यावर निघताना कॅमेऱ्यात कैद झाली असून, ती अत्यंत आनंदी आणि उत्साही मूडमध्ये असल्याचे जाणवते.

दरम्यान, गेल्या वर्षी महाकुंभमेळ्यात (Mahakumbh Mela) ममता कुलकर्णीने सर्वांना मोठा धक्का दिला होता. त्या वेळी ती भगवी वस्त्रे परिधान करून, कपाळावर टिळा लावून आणि फुलांच्या माळांवर बसून दुधाने स्नान करताना दिसली होती. तिने आपले नाव बदलून ‘यमाई ममता नंदगिरी’ (Yamai Mamta Nandagiri) असे ठेवले होते आणि अनेक वर्षे तपश्चर्या केल्याचा दावाही केला होता.

या अध्यात्मिक प्रवासादरम्यान तिची नियुक्ती किन्नर आखाड्याच्या (Kinnar Akhada) महामंडलेश्वर (Mahamandaleshwar) पदी करण्यात आली होती, मात्र हे पद प्रचंड वादात सापडले होते. प्रदीर्घ काळानंतर ती अलीकडेच ‘मास्टरशेफ 3’ (MasterChef 3) या कार्यक्रमाच्या सेटवर देखील झळकली होती, ज्यामुळे तिच्या पुनरागमनाच्या चर्चांना उधाण आले आहे.

Join WhatsApp Group

Join Now