सर्वात मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल जाहीर

On: July 31, 2025 11:41 AM
Malegaon bomb blast Result
---Advertisement---

Malegaon Bomb Blast Result | 2008 मध्ये महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल अखेर आज (31 जुलै 2025) जाहीर झाला. एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व आठही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, स्वामी अमृतानंद, अजय राहिरकर, सतीश चतुर्वेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश आहे. (Malegaon Bomb Blast Result)

न्यायालयीन निर्णयाचा तपशील :

विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांनी निकाल वाचून दाखवला. NIA कडून सात आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने दाखल केलेले पुरावे अपुरे आणि अविश्वसनीय असल्याचे स्पष्ट करत सर्व आरोपींना दोषमुक्त केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काय? :

दिनांक: 29 सप्टेंबर 2008
वेळ: रात्री 9:35
ठिकाण: मालेगाव, नाशिक – मशिदीशेजारी भिक्खू चौक
मृत्यू: 6 ठार, 100 हून अधिक जखमी
धर्मिक सणाचा कालावधी: रमजान आणि नवरात्रीच्या पूर्वसंध्येला
स्फोटात वापरलेली मोटारसायकल: साध्वी प्रज्ञासिंह यांच्याशी संबंधित असल्याचा दावा

Malegaon Blast Result | तपास आणि सुनावणीचा प्रवास :

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला ATS, नंतर CBI आणि शेवटी NIA कडे सोपवण्यात आला. 2016 मध्ये NIA ने पूरक आरोपपत्र दाखल करत साध्वी यांच्यावर पुरावे नसल्याचे नमूद केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावर UAPA अंतर्गत आरोप ठेवत खटला चालू ठेवला. या खटल्यात 323 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले, त्यापैकी 34 फितूर झाले. तसेच 17 वर्षांच्या लांबलेल्या न्यायप्रक्रियेनंतर आज निकाल घोषित करण्यात आला. (Malegaon Bomb Blast Result)

या प्रकरणाला हिंदुत्ववाद, दहशतवाद आणि राजकारणाचा त्रिकोण असल्याचे अनेकदा म्हटले गेले. आरोपींचे अनेक राजकीय संबंध, विशेषतः साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भाजपमधील स्थानामुळे, या खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते.

न्यायालयाने स्पष्ट केलं की, एनआयएकडून सादर करण्यात आलेले पुरावे आरोपींना दोषी सिद्ध करण्यास अपुरे आहेत.

Newsh Title: Malegaon Blast Verdict: All Accused Including Sadhvi Pragya and Col Purohit Acquitted After 17 Years

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now