Malaika Arora | बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फॅशन्स आणि तिच्या बोल्ड अंदाजाला घेऊन नेहमी चर्चेत असते. मलायका अरोरा (Malaika Arora) आणि तिचा आधीचा पती अरबाज खान यांच्या नात्याला घेऊन ती नेहमी चर्चेत पाहायला मिळत होती. सध्या अर्जुन कपूरला ती डेट करत आहे. मात्र आता मलायका एक तिच्या फ्लॅटला घेऊन चर्चेत आली आहे.
मलायकाने भाडेतत्त्वार दिला फ्लॅट
दरम्यान मलायका (Malaika Arora) ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. तिने नुकताच मुंबईतील करोडो रूपयांचा फ्लॅट भाडेतत्वार दिला आहे. तसेच मलायका अरोरा (Malaika Arora) ही फक्त फॅशनमधूनच नाही तर जाहिरातीमधूनही तगडी कमाई करते. मलायकाचा मुंबईतील पाली हिलजवळील फ्लॅट हा भाडेतत्वावर देण्यात आला आहे. तिने तिच्या स्वबळावर फ्लॅट खरेदी केला असल्याचं बोललं जात आहे.
फ्लॅटच्या भाडेतत्त्वातून मलायका किती कमाई करते?
मलायकाने कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून कशिश हंस हिला आपला फ्लॅट भाड्याने दिला आहे. हेच नाहीतर मलायकाने तीन वर्षांसाठी फ्लॅट भाडेतत्त्वार दिला आहे. सुरूवातीला पहिल्या वर्षात मलायकाला मासिक 1.5 लाख रूपये भाडे मिळेल. तसेच त्यानंतर त्या भाडेतत्त्वात पाच टक्के वाढ होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे.
दुसऱ्या वर्षी भाडेतत्वाचा विचार केला तर मलायकाला मासिक 1 लाख 57 हजार रूपये भाडे मिळणार आहे. तर तिसऱ्या वर्षी 1.65 लाख भाडे असणार आहे. हंस हिने डिपॉझिट म्हणून मलायका अरोराला 4.5 लाख रूपये दिले आहेत.
मलायकाचे पाली हिलच नाहीतर इतर भागांमध्येही फ्लॅट आहेत. मलायका अरोराचा पाली हिल येथील फ्लॅट हा अलिशान असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
दरम्यान, काही दिवसांआधी मलायकाचा मुलगा अरहानने मलायकाची त्याच्या पोडकास्टसाठी एक मुलाखत घेतली होती. तेव्हा अरहानने आपल्या आईला म्हणजे मलायकाला पुन्हा लग्न कधी करणार? असा प्रश्न केला होता. त्यावर मलायका म्हणाली की, मी याचं उत्तर सांगू शकत नाही. जेव्हा मला वाटेल तेव्हा याचा विचार करेल असं मलायकाने उत्तर दिलं होतं.
News Title – Malaika Arora Has Given Her Flat On Rent Pali Hill
महत्त्वाच्या बातम्या
“ईडीने जप्त केलेले पैसे मी गोरगरिबांना देणार”, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
कोवॅक्सिन लसीने चिंता वाढवली; नागरिकांमध्ये आढळतायेत हे गंभीर आजार
“आई-वडिलांच्या भांडणांमुळे शाळेत लाज..”; रणबीर कपूरने केला खुलासा
“मोदी फक्त गायीवर बोलतात महागाईवर बोलत नाहीत”, उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका
महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट!






