ISI Spy Network India | देशाच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले असून Inter-Services Intelligence (ISI) कडून भारतातील संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्याचा मोठा कट उघडकीस आल्याची माहिती समोर येत आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या आणि SIM-आधारित CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून भारतीय सैन्य हालचाली आणि महत्त्वाच्या ठिकाणांचे लाईव्ह फुटेज पाकिस्तानात पाठवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Border Security Force (BSF) च्या G-Branch ने याबाबत गेल्या वर्षीच केंद्रीय यंत्रणांना सतर्क केले होते. त्यानंतर विविध सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला.
दिल्ली-पंजाबमध्ये मोठी कारवाई :
दिल्ली पोलीस (Delhi Police) च्या स्पेशल सेलने गुप्त माहितीच्या आधारे मोठे ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान पंजाब आणि दिल्लीमधून एकूण 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
छापेमारीत पोलिसांनी सौरऊर्जेवर चालणारे 9 CCTV कॅमेरे जप्त केले. या कॅमेऱ्यांमध्ये SIM कार्ड बसवलेले होते, ज्यामुळे ते थेट डेटा बाहेर पाठवू शकत होते. याशिवाय 4 पिस्तुलं आणि 24 जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.
ISI Spy Network India | संवेदनशील ठिकाणी बसवले होते कॅमेरे :
हे कॅमेरे अत्यंत संवेदनशील ठिकाणी लावण्यात आले होते, जेणेकरून महत्त्वाच्या हालचालींचे लाईव्ह फुटेज मिळवता येईल. विशेष म्हणजे, काही कॅमेरे आधीपासूनच माहिती बाहेर पाठवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हे कॅमेरे पंजाब (Punjab) मधील कपूरथला, जालंधर, पटियाला आणि मोगा तसेच Delhi NCR परिसरात बसवण्यात आले होते.
ISI नेटवर्कची भांडाफोड :
या तपासात Inter-Services Intelligence च्या भारतातील सक्रिय नेटवर्कची भांडाफोड झाली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांचा पाकिस्तानातील संपर्कांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणामुळे देशाच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. पुढील तपास सुरू असून या कटामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.






