मावळमध्ये महायुतीत फुट, राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होताच भाजपचं राजीनामासत्र

On: October 24, 2024 2:12 PM
Maharashtra
---Advertisement---

Mahayuti | महायुतीमध्ये विधानसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर होताच इच्छुक नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं आहे. अनेक ठिकाणी इच्छूकांनी बंडखोरी पुकारली आहे. आता मावळमध्ये भाजपसह महायुतीला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. येथे महायुतीकडून अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, याला भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. (Mahayuti)

सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर बापू भेगडे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत बंडखोरी केलेल्या बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केलाय. यामुळे बापू भेगडे यांची ताकद आता वाढली आहे.

मावळमध्ये भाजपच्या माजी राज्यमंत्र्याचा राजीनामा

“जनसंघापासून आम्ही भाजपचे काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांला राजकारणातून संपून टाकण्याची भाषा केली. खच्चीकरण केले. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शेळके यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आम्ही राजीनामे देऊन बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.”, असं बाळा भेगडे म्हणाले आहेत.

मावळच्या जनतेच्या आशिर्वादावर बापू भेगडे यांना निवडूण आणणार असल्याचं बाळा भेगडे यांनी म्हटलं आहे. आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात भाजप टिकला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. पाच वर्ष आम्ही खूप भोगलंय. आता आमचं लक्ष बापू भेगडे यांना निवडून आणणे हेच असल्याचं बाळा भेगडे म्हणाले आहेत. (Mahayuti)

सुनिल शेळके यांच्या उमेदवारीला विरोध

यातून मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून येतंय. यामुळे महायुतीचं मावळमध्ये टेंशन वाढणार आहे. राजीनामे देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंच्या डोळ्यात अश्रु देखील दिसून आले. याचा फटका आता अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळकेंना बसण्याची शक्यता आहे. (Mahayuti)

News Title :  Mahayuti Big BJP leader resigns in Maval

महत्वाच्या बातम्या –

आपला झेंडा, आपला अजेंडा! जरांगे पाटील आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं?

विधानसभा निवडणुकीवर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य!

ग्राहकांना झटका! दिवाळीपूर्वीच सोनं गेलं 80 हजार पार?; जाणून घ्या आजचे भाव

BSNL ने वाढवलं टेलिकॉम कंपन्यांचं टेंशन, आता 5G च नाही तर..

‘दाना’ चक्रीवादळामुळे 56 टीम्स हाय अलर्टवर; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

Join WhatsApp Group

Join Now