सर्वात मोठी बातमी! महाविकासआघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर

On: October 22, 2025 2:01 PM
Maha Vikas Aghadi
---Advertisement---

Maharashtra Politics | मुंबई महानगरपालिकेच्या 2026 (BMC Election 2026) च्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष (Congress Party) येत्या बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत म्हणजेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) दोघांसोबतही लढणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या (Mumbai) राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला असून, महाविकास आघाडीतील एकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“ठाकरे बंधूसोबत आघाडी नको”

भाई जगताप यांनी सांगितले की, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना देखील हेच सांगितले होते की, काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) जाऊ नये आणि राज ठाकरेंचा (Raj Thackeray) तर प्रश्नच येत नाही. आमच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीतही मी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांच्या समोर हीच भूमिका स्पष्ट केली होती.” त्यांनी पुढे सांगितले की, “या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाहीत. आमचे कार्यकर्ते अनेक वर्षे पक्षासाठी काम करत आहेत, त्यांनाही निवडणूक लढवण्याची इच्छा असते. त्यामुळे काँग्रेसने या निवडणुका स्वबळावर लढाव्यात आणि कोणासोबत युती करायची हे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनाच ठरवू द्यावे.”

भाई जगताप यांच्या या भूमिकेला मुंबई काँग्रेसमध्ये (Mumbai Congress) मोठे महत्त्व आहे, कारण ते पक्षाचे निष्ठावंत नेते मानले जातात आणि त्यांना शहरात मोठा कार्यकर्ता वर्ग पाठिंबा देतो. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसच्या भविष्यातील रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. त्यांनी यावेळी महाविकास आघाडीतील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटलं की, “उद्धव ठाकरे जेव्हा महाविकास आघाडीत आले, तेव्हा शिवसेना (ShivSena) एकच होती; पण आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे आणि काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा विचार करायला हवा.”

अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार

दरम्यान, काँग्रेसच्या मीडिया सेल प्रमुख सचिन सावंत यांनी स्पष्ट केले की, भाई जगताप यांची मते त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली आहेत. पण अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) या स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानेच लढवल्या जातात. हायकमांड सर्वांची मते ऐकूनच अंतिम निर्णय जाहीर करेल,” असे सावंत यांनी सांगितले.

या घडामोडीमुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील नाते तणावपूर्ण झाले असून, बीएमसी निवडणुकीच्या तयारीदरम्यान महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title- The biggest news; Mahavikas Aghadi on the verge of breaking up

Join WhatsApp Group

Join Now