जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी बातमी! तारखेबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट

On: September 24, 2025 1:15 PM
BMC Election 2026
---Advertisement---

Maharashtra ZP Elections | राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका (Nagarpalika Election) आणि महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आता वेगाने आकार घेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी या सर्व निवडणुका पार पाडणे बंधनकारक असल्याने राज्यात निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. (Maharashtra ZP Elections)

मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम :

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांचे गण यांच्या प्रभाग रचना पूर्ण केल्या आहेत. आता राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 1 जुलै 2025 च्या विधानसभा मतदार यादीवर आधारित गट व गणनिहाय विभागणी करून नवीन यादी तयार केली जाणार आहे. (Maharashtra ZP elections 2025)

8 ऑक्टोबर 2025 – प्रारूप मतदार यादी तयार होईल.

8 ते 14 ऑक्टोबर 2025 – हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील.

27 ऑक्टोबर 2025 – मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होईल.

यामुळे ऑक्टोबरच्या अखेरीस मतदार यादी निश्चित होईल आणि त्यानंतर काही दिवसांतच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra ZP Elections | निवडणुका कधी होणार? :

समोर आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात. तर जानेवारी 2026 मध्ये राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये भंडारा, गोंदिया, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळण्यात आले आहेत. (Maharashtra ZP Elections)

या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. सर्वच पक्ष आता कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच ग्रामीण आणि शहरी भागातील सत्ता मिळवण्यासाठी महत्वाची लढत असल्याने प्रचाराचा धुरळा उडणार हे निश्चित आहे.

News Title: Maharashtra ZP Elections Update: Final Voter List by Oct 27, Polls Likely in December

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now