Weather Updates l सध्या वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस राज्यात हजेरी लावत आहे. गेल्या 24 तासांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे मोठ्या दुर्घटना देखील घडल्या आहेत. मात्र अशातच आता हवामान विभागाने राज्यात मान्सून कधी दाखल होणार याबाबतचा महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा :
गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली या परिसरात काल वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला आहे. मात्र त्यानंतर आता मान्सूनचा पाऊस राज्यात कधी दाखल होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 19 मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होणार आहेत. त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करणार आहेत. हवामान विभागाकडून अजून तरी मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सध्या वातावरणाचा विचार करता गेल्यावर्षीच्या तुलनेत देशासह राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Weather Updates l महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होणार :
मान्सूनचा पाऊस 21 मे च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होत असतो. अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जात असते. मात्र यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता कॅरटवाली जात आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते.
मात्र मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गतवर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. परंतु यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
News Title – Maharashtra Weather Updates
महत्त्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून आजचे दर
महाराष्ट्रात पुन्हा पाय पसरतोय कोरोना, पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
बाईक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक लाँच
…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली ठाकरेंची इज्जत
येत्या काही दिवसांत या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळणार






