मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा

On: May 13, 2024 11:12 AM
Weather Updates
---Advertisement---

Weather Updates l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहेत. येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि रायगडमध्ये पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. मुंबईत आज हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामानाचा अंदाज काय आहे? :

कोकणात काही ठिकाणी हलक्या पावसासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज मुंबईत विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तास आकाश बहुतांशी निरभ्र राहील आणि संध्याकाळी अंशतः ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

Weather Updates l या भागात पावसाचा अंदाज? :

हवामान खात्याच्या आजच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच IMDM ने मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत कोकणातही पावसाची शक्यता आहे. याशिवाय नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता असून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, सातारा, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

News Title – Maharashtra Weather Updates

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने घेऊन गेले ‘या’ मतदारसंघात पैशांच्या बॅगा; ‘या’ बडया नेत्याचा आरोप

मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू

राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका

अहमदनगरमध्ये आदल्या रात्री भाजपने पाडला पैशांचा पाऊस; व्हिडीओ समोर

या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळेल; विरोधकांना धूळ चारणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now