‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; धो-धो पाऊस बरसणार

On: May 10, 2024 9:12 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला. पुणे शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील कोंढवा, स्वारगेट आणि कात्रज परिसरामध्ये चांगला पाऊस पडला. तर राज्यातील सांगली येथे वळवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस

पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाकडून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Weather Update)

पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो. पुण्यातील अनेक भागातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं सावट आहे. एवढंच नाहीतर आणखी येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच्या दिवसासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तर येत्या दोन दिवसांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

साताऱ्यात 12 मे रोजी येलो अलर्ट जारी केलं आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांसाठी 12 तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात विजेसह अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्यांच्या वाऱ्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. (Maharashtra Weather Update)

अवकाळी पावसाचा प्रचारसभांना फटका

पुणे शहरात काही ठिकाणी आज सभा नियोजित करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही पावसामुळे त्या सभा पूर्ण करता आल्या नाहीत.

सांगलीमध्ये वळवा तालुक्यात दुपारी आभाळ होतं. मात्र त्यानंतर काही वेळानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह 20 मिनिटे गारपीट देखील झाल्याचं समजतंय. गारपिटीमुळे आंब्याचे, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

News Title – Maharashtra Weather Update Unseasonal Rain News

महत्त्वाच्या बातम्या

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना मोठा दिलासा; आधी जन्मठेपेची शिक्षा आता…

…म्हणून लोक लग्नानंतरही प्रेमप्रकरणात अडकतात; ‘ही’ आहेत कारणं

रवींद्र वायकरांना अडचणीत आणण्यासाठी ठाकरेंनी आखला मोठा डाव; थेट….

सलमान लग्न कधी करणार?; मिथुन चक्रवर्तींनी केला मोठा खुलासा

अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, तिहार जेलमधून बाहेर येणार

Join WhatsApp Group

Join Now