5 दिवसांसाठी अलर्ट! महाराष्ट्रात गारपीट आणि पावसाचा इशारा, तुमच्या भागातील स्थिती जाणून घ्या

On: May 5, 2025 8:12 AM
Weather
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात तापमान ४० अंशांच्या पलीकडे गेले असतानाही अवकाळी पावसाचे संकट गडद होत आहे. गुजरातच्या समुद्रात तयार झालेल्या वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे महाराष्ट्रात पाच दिवस गारपीट व वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update )

अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असून त्याचवेळी गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हवामानात अचानक बदल होऊ लागला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या वातावरणीय बदलाचा परिणाम म्हणून राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून अनेक भागांत विजांसह पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार व गुरुवारी गारपीट होण्याची शक्यता असून विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हे संकट अधिक गडद आहे.

विदर्भात तापमानात घसरण

यंदा विदर्भात अवकाळी पावसाचे वारंवार संकट पाहायला मिळत आहे. नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांतील तापमान सध्या ४० अंशाच्या वर असून अवकाळीमुळे ते ३८ ते ४१ अंशांदरम्यान राहील, असा अंदाज वर्तवला गेला आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे केळी, पपई, तीळ, भाजीपाला यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पवनार, सुरगाव, रेहकी यांसारख्या गावांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट, तापमानात बदल

पुणे हवामान विभागाने शहराला यलो अलर्ट दिला असून मंगळवारपासून पुढील चार दिवस वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या पुणे शहरात ढगाळ हवामान असून कमाल तापमानात २ अंशांनी घट तर किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली आहे.

Title : Maharashtra Weather Update Hailstorm and Rain alert for 5 Days

 

Join WhatsApp Group

Join Now