मतदान संपण्याआधीच अवकाळी पावसाचा धुमाकूळ, मतदानाच्या टक्केवारीत घसरण होण्याची शक्यता

On: May 13, 2024 5:48 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपण्याच्या काही तास आधीच अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केलं. तसेच या अवकाळी पावसाने (Maharashtra Weather Update) राज्यातील मतदान हे ठप्प पडल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

अवकाळी पावसामुळे मतदानाच्या टक्केवारीत घसरण

अवकाळी पावसामुळे येणाऱ्या 48 तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. यामुळे आज राज्यातील काही मतदारसंघात या अवकाळी पावसाने मतदानाच्या वेळेआधीच हजेरी लावल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची चिन्हे नाकारता येणार नसल्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोर लावला आहे. शेतकरी बांधवांच्या फळांचे, शेतीचे नुकसान झाले आहे. पिके ही जमीनदोस्त झाली आहेत. राज्यात आज ज्या मतदारसंघात मतदान होतं. त्याठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत घसरण होऊ शकते.

मुंबई आणि ठाणे या परिसरात येत्या 48 तासापर्यंत जोरदार पाऊस राहणार असल्याचं सांगितलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

विदर्भातही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही तास अजून पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारताच्या हवामानशास्त्रानुसार विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

News Title – Maharashtra Weather Update During Maharashtra Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

ईव्हीएम मशीनबाबत किरण मानेंची पोस्ट व्हायरल, म्हणाले…

बारामतीत EVM ठेवलेल्या रुमचे CCTV 45 मिनिटं बंद; शरद पवार गटाकडून गैरप्रकार घडल्याची शंका

धक्कादायक! पुण्यात बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान तर जिवंत मतदाराला दाखवलं मृत

“शहरभर मुरलीधर”, प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट

“मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक…”, राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचा करारा जवाब

Join WhatsApp Group

Join Now