काळजी घ्या! राज्यातील ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट येणार

On: May 25, 2024 1:20 PM
Maharashtra Weather Update 25 May 2024
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सकाळी आणि दुपारून तापमानामध्ये प्रचंड वाढ होत असून रात्रीच्या वेळेला मुसळधार पाऊस पडतोय. या बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या देखील अनेक समस्या उद्भवत आहेत.

आता पुढील काही दिवस कुठे पावसाची तर कुठे तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार  आज (25 मे) कोकणामध्ये सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यात, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि उत्तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

या भागात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या भागात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. येत्या दोन-तीन दिवसात येथे ढगाळ वातावरणसह पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे (Maharashtra Weather Update ) शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढली आहे.

‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

या भागांमध्ये 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भामधील सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.या उलट इतर काही भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

हवामान विभागाने उद्या 26 मे रोजी मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Update ) धुळे, जळगाव, अमरावती, चंद्रपूर तर आज 25 मे रोजी नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुण्यात तापमान कसं राहील?

पुणे व परिसरात आज 25 मे रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी तसेच संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

News Title-  Maharashtra Weather Update 25 May 2024

महत्त्वाच्या बातम्या –

उद्धव ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, ‘या’ नेत्याचं निधन

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

अग्रवालांनी ड्रायव्हरला डांबून ठेवलं!, धक्कादायक घटनाक्रम आला समोर; पोलिसांकडून आता आजोबाला अटक

आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवास टाळावा

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकावर मोठी कारवाई!

Join WhatsApp Group

Join Now