Maharashtra Weather Update | काल 20 मे रोजी बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. पुणे शहर, बारामती, इंदापूर या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडून गेला. अजूनही येथे ढगाळ वातावरण पाहावयास मिळत आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय.
राज्यात आज देखील वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी उकाडा वाढल्याचं चित्र आहे. ठाणे, मुंबई, रायगड व पालघर येथे आज उष्ण व दमट हवामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
‘या’ ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट
हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाय. या उलट उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम मराठवाडा व पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्याचा पाऊस होईल. वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी असेल. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
वातावरणातील खालच्या स्थरातील द्रोणीय रेषा खालच्या वायव्य उत्तर प्रदेश पासून पश्चिम विदर्भापर्यंत जात आहे. यामुळे संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
पुण्यात कसं राहील तापमान?
पुण्यात आज 21 मे रोजी आणि उद्या 22 मे रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहून सकाळी, दुपारी, संध्याकाळी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात सर्वाधिक तापमान जळगावमध्ये नोंदवलं गेलं आहे. येथे 43.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमान राहण्याची शक्यता आहे.
News Title- Maharashtra Weather Update 21 may
महत्वाच्या बातम्या-
“गुन्हा दडवायला सिस्टीम एकत्र येते पण..”; पोर्शे अपघातावर ‘या’ कलाकाराची संतप्त पोस्ट
“…तर मी BJP सोडेल”, अभिनेता शेखर सुमनचं मोठं वक्तव्य
पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुलाच्या कबुलीने खळबळ!
कुख्यात गुंड गजानन मारणेनं आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर मारलं!
बारावीचा निकाल जाहीर! विद्यार्थ्यांनो पुढच्या प्रवेशासाठी काढून ठेवा ‘ही’ कागदपत्रे






