सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

On: September 20, 2024 12:48 PM
Maharashtra Weather Update 20 September
---Advertisement---

Maharashtra Weather Update | गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील दोन दिवसात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update )

आज 20 सप्टेंबरपासून ते पुढील दोन दिवस म्हणजेच 22 आणि 23 सप्टेंबरपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. आज पासून पुढील तीन दिवस विदर्भात काही ठिकाणी तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात पाऊस बरसणार?

मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव , नांदेड, लातूर तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई पुण्यातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई शहर व उपनगरात पुढील काही तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे तापमान 32 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काही अंशी दिलासा मिळेल.(Maharashtra Weather Update )

पुण्यात कसं राहणार हवामान?

पुणे व परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपार व संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून दुपार व संध्याकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather Update )

News Title – Maharashtra Weather Update 20 September

महत्त्वाच्या बातम्या-

घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान, अभिषेक बच्चनने उचललं मोठं पाऊल!

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार; ‘या’ पक्षांचा समावेश

काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, राऊतांच्या वक्तव्यामुळे माविआमध्ये फूट पडणार?

सरकारचा मोठा निर्णय! वीज दर ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार

मोठी बातमी! भाईजानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या फोटोने खळबळ

Join WhatsApp Group

Join Now