Maharashtra Weather | राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अवकाळी पाऊस हा कमी आहे. यामुळे यंदा पावसाळ्यात पावसाचं प्रमाण हे अधिक असणार आहे. मागील वर्षी सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला. यामुळे पावसाळ्य़ात पावसाचं प्रमाण घटलं. यामुळे यंदा पाण्याची टंचाई जाणवू लागली. याचा मोठा फटका हा पुणे मुंबईसारख्या शहरांना बसला. (Maharashtra Weather)
मात्र आता यंदाही अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र यंदा अवकाळी पावसाचा जोर हा मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी असल्याचं हवामान खातं सांगत आहे. यामुळे यंदा पावसाळ्यात पावसाची चांगली स्थिती पाहायला मिळू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra Weather)
शहरासह ग्रामीण भागात पावसाची बॅटिंग
सध्या अवकाळी पावसाने शहराप्रमाणे ग्रामीण भागालाही झोडपून कढलं आहे. यामुळे फळं, फळभाज्या, ऊस असे अनेक पिकांची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आता हवमान खात्याने येणारे पुढील 24 तास हाय अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather)
हवमान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यासोबतच गारपिटीचा देखील अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे कोकण आणि विदर्भात देखील धो धो पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra Weather)
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
पावसासह वादळी वाऱ्याचं सावट देखील असणार आहे. वादळी वारे हे दर ताशी 40 किमी असणार आहेत. वाशिम, नागपूर, बुलढाणा, अमरावती अकोला, पुणे या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडटासह गारपिटीचा अंदाज असल्याचं हवमान खातं सांगत आहे.
पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगितलं आहे. तर पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केलं आहे. तर जेऊर येथे 45 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे.
News Title – Maharashtra Weather Unseasonal Rain Update News
महत्त्वाच्या बातम्या
“चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, तेरे नाम भांग पाडून फिरत असतात”
भरसभेत Love You Too असं देवेंद्र फडणवीस कोणाला म्हणाले?, नेमकं काय घडलं?
“अजून एका गुलामाची भर पडली”; संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एकनाथ खडसेंची सर्वात मोठी घोषणा!






