शेतकऱ्यांची चिंता वाढली; अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

On: May 12, 2024 9:58 AM
Maharashtra Weather unseasonal rain alert
---Advertisement---

Maharashtra Weather | राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालंय. काही ठिकाणी पाऊस पडून गेलाय.काल (11 मे) रात्री मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस पडला. यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

आजही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. आज पासून पुढील 17 ते 18 मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड ,छत्रपती संभाजीनगर, लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वादळी वाऱ्यासाह पाऊस पडणार असल्याने नगरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. वातावरणातील खालच्या थरातील द्रोणीका रेषा ही मराठवाड्यापासून कोमोरियन भागापर्यंत जात असल्याने महाराष्ट्राच्या चारही विभागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची (Maharashtra Weather)  शक्यता आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा , वाशिम जिल्ह्यामध्ये दिनांक 13 मे रोजी मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

पुण्याला काही दिवस ऑरेंज आणि यलो अलर्ट

पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता (Maharashtra Weather) आहे. येथे आज 12 मे आणि पुढील दोन-तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

News Title : Maharashtra Weather unseasonal rain alert

महत्त्वाच्या बातम्या-

सुवर्णसंधी! बिग डिस्कॉउंटसह खरेदी करा ‘हा’ तगडा स्मार्टफोन

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘या’ उमेदवारांमध्ये होणार कांटे की टक्कर; जनतेचा कौल कोणाला?

आज या दोन राशींचे नशीब चमकणार; होणार मालामाल

‘स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही, तुम्ही…’; बजरंग सोनवणेंनी केली अजित पवारांची बोलती बंद

“बडे नेते जेलमध्ये जाणार”; अरविंद केजरीवालांच्या दाव्यामुळे खळबळ

Join WhatsApp Group

Join Now