राज्यात उद्या वातावरण कसं राहणार? वाचा हवामान विभागाचा नवा अंदाज

On: August 18, 2026 7:14 PM
Maharashtra Weather
---Advertisement---

Maharashtra Weather | ऑगस्ट महिन्याचा मध्य उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी 19 ऑगस्ट रोजी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा :

ऑगस्टचे दोन आठवडे संपले असतानाही राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. परिणामी उन्हाचा तडाखा वाढला असून शेतांमध्ये उगवलेली खरीप पिके पाण्याअभावी कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. काही भागांत अधूनमधून हलक्या सरी पडत असल्या, तरी मोठ्या क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता नसली तरी काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहू शकते. मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli), परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथेही काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज असून या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather | उद्या कुठे पावसाचा जोर? :

बुधवार, 19 ऑगस्ट रोजी जालना (Jalna), बीड (Beed), धाराशिव (Dharashiv), सोलापूर (Solapur) आणि लातूर (Latur) जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्याचवेळी गोंदिया (Gondia) जिल्ह्यात काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी हवामानातील बदलाकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याशिवाय जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule), नाशिक (Nashik), छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर (Ahilyanagar), सांगली (Sangli), रत्नागिरी (Ratnagiri), परभणी, नांदेड (Nanded) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नसली, तरी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहण्याचा अंदाज आहे. या भागांत हलका पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो.

News title : Maharashtra Weather Tomorrow: Yellow Alert in Six Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now