पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा

On: September 6, 2024 12:09 PM
Maharashtra Weather News September 6
---Advertisement---

Maharashtra Weather News | राज्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. हवामान विभागाने आजही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather News)

आज कोकणासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील घाट माथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस पडेल.

कोकण आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

आज विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही आज पावसाची शक्यता आहे. मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. (Maharashtra Weather News)

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड , लातूर आणि धाराशीव येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. येथे कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाचा जोर वाढू शकतो.9 सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.

पावसामुळे विदर्भात शेतीचे अतोनात नुकसान

मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका हा मराठवाडा आणि विदर्भाला बसला येथे. येथे प्राथमिक आकडेवारीनुसार साडेनऊ हजार हेक्टरवर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वाशिम, बुलढाणा आणि अकोला या तीन ठिकाणी सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. अजूनही पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Weather News)

News Title –  Maharashtra Weather News September 6

महत्त्वाच्या बातम्या-

लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले; काय आहे सध्या भाव?

राज्यात 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार, महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता

आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त

आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा

वनराज आंदेकरच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतली शपथ, म्हणाले ‘आता मी…’

Join WhatsApp Group

Join Now