Maharashtra Weather | राज्यात अवकाळी पावसाचे ढग दूर झाल्यानंतर आता उष्णतेचे नवे संकट घोंगावत आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात प्रचंड वाढ होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. (Maharashtra Weather )
विदर्भात उष्णतेची लाट-
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळिशी पार केली असून, उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत आहे. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अमरावती, अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचले. यवतमाळ व सोलापूरमध्ये ४३ अंशांची नोंद झाली. माळकापूर, गडचिरोली, शिर्डी, परभणी, गोंदिया आणि जळगावसारख्या जिल्ह्यांतही ४२ अंशांपर्यंत तापमान वाढले आहे.
अशा उष्ण लाटेमुळे अंगाची लाहीलाही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि आरोग्यदृष्ट्या कमकुवत व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
राज्यात काही भागांत पावसाचा इशारा
उत्तर छत्तीसगडपासून तामिळनाडूपर्यंत सक्रिय असलेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याने (Weather Department) वर्तवला आहे.
दुसरीकडे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर (Konkan) आणि छत्रपती संभाजीनगर, जालना (Marathwada) या जिल्ह्यांमध्ये हवामान अधिक दमट होण्याची शक्यता असून, त्यामुळे अस्वस्थता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather )
या जिल्ह्यांमध्ये दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे. पाणी पुरेसे प्यावे, शरीर झाकणारे सैलसर आणि हलक्या रंगाचे कपडे घालावेत, उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, सनग्लासेस वापरावेत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Title : Maharashtra Weather Heatwave Alert in 12 Districts






