राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Monsoon Update l राज्यातील शेतकरीवर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पेरणी लांबवणीवर पडल्याने शेतकरी आतुरतेने पावसाची वाट होते. अशातच आता हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. सध्या मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील चार आठवडे राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची दात शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मान्सून दाखल; मुसळधार पाऊस कोसळणार :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार राज्यातील संपूर्ण भागात 13 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सून कोसळला आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी केला आहे. हवामान खात्याकडून सिलेल्या अलर्टनुसार, पुढील 5 दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Monsoon Update l या जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता :

राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा व हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, पुणे, परभणी, अहमदनगर, रायगड, नाशिक, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जालना, धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, बीड या जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस हजेरी लावणार आहे.

News Title – Maharashtra Weather Forecast

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार गटाचे ‘हे’ 6 आमदार नाराज; घरवापसी करणार? अजित पवार म्हणाले…

या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत

“देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झाला”; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

अजित पवार म्हणालेले ‘तुला बघतोच’, बजरंग सोनवणे म्हणाले ‘बघा मी निवडून…’

‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार; हवामान विभागाचा इशारा