विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! शाळांच्या सुट्ट्यांच्या नियमात मोठा बदल; पाहा शिक्षण विभागाचे नवे आदेश

On: March 30, 2026 1:02 PM
Maharashtra School Timing
---Advertisement---

Maharashtra School Reopen 2026 | महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा उन्हाळी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात बदल करत राज्यभर एकसमान नियम लागू करण्यात आला आहे. (School Reopen Date)

शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीसाठी सुट्टी मिळणार असून पालकांनाही शाळांच्या वेळापत्रकाबाबत स्पष्टता मिळाली आहे.

15 जूनपासून पुन्हा सुरू होणार शाळा :

शिक्षण विभागाने यंदा एक महत्त्वाचा बदल करत राज्यातील सर्व विभागांतील शाळा 15 जूनपासून एकाच दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे त्या भागातील शाळा इतर विभागांच्या तुलनेत साधारण आठ ते दहा दिवस उशिरा सुरू होत असत. मात्र, यंदा हा फरक दूर करून राज्यभर एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. (Maharashtra School Reopen 2026)

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे नियोजन अधिक सुसंगत पद्धतीने करता येणार आहे. तसेच सर्व विभागांतील शैक्षणिक सत्र एकाच वेळी सुरू होणार असल्याने शिक्षण व्यवस्थेत एकरूपता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Maharashtra School Reopen 2026 | उष्णतेमुळे सकाळच्या सत्रात होणार शाळा :

जून महिन्यातील वाढत्या उष्णतेचा विचार करून शिक्षण विभागाने काही विशेष सूचना देखील दिल्या आहेत. 15 जून ते 29 जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या काळात शाळा सकाळी 7 वाजता सुरू होऊन 11.45 वाजेपर्यंत चालवण्यात येणार आहेत. (Maharashtra Summer Vacation 2026)

30 जूननंतर मात्र शाळा पुन्हा नेहमीच्या वेळापत्रकानुसार नियमित सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व विभागीय आणि जिल्हा स्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.

News Title : Maharashtra School Reopen 2026: Big Change in Summer Vacation Rules; Schools Across State to Reopen on June 15

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now