उद्या महाराष्ट्रात कसं वातावरण असणार? वाचा हवामान अंदाज

On: June 21, 2026 6:22 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update |  महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनच्या आगमनाला अद्याप अपेक्षित वेग मिळालेला नसला तरी पुढील 24 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि रायगड (Raigad) परिसरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, सोमवारी 22 जून रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.

पावसासह वादळी वाऱ्यांचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी विविध स्तरांवरील इशारे जारी केले आहेत. दक्षिण कोकण-गोवा भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता असून मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या 17 जिल्ह्यांमध्ये पालघर (Palghar), ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli), सोलापूर (Solapur), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), बीड (Beed), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), भंडारा (Bhandara), गडचिरोली (Gadchiroli) आणि वर्धा (Wardha) या जिल्ह्यांचा समावेश आहे.

विदर्भात पावसासोबत उष्णतेची लाट

हवामान विभागाने नागपूर (Nagpur), गोंदिया (Gondia) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अकोला (Akola), अमरावती (Amravati) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शहरातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनला अद्याप पूर्ण वेग मिळालेला नसला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

News title | Maharashtra Rain Alert Tomorrow

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now