सावधान! पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस; अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

On: June 30, 2026 12:24 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे (India Meteorological Department) ने विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करत नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर :

सध्या राज्यातील तब्बल 27 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने इशारे जारी केले आहेत. रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरात जोरदार पावसासोबत वाऱ्याचाही वेग वाढण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. यामुळे तापमानात घट होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी वाहतूक आणि दैनंदिन प्रवासादरम्यान काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. विशेषतः सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Rain Alert | मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही इशारा :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), जालना (Jalna), परभणी, बीड (Beed), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded) आणि लातूर (Latur) या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संपूर्ण विभागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे शेतकरी तसेच बाहेरील कामे करणाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला (Akola), अमरावती (Amravati), भंडारा (Bhandara), बुलढाणा (Buldhana), चंद्रपूर (Chandrapur), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) आणि वर्धा (Wardha) जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

News Title: Maharashtra Rain Alert for 27 Districts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now