निवडणुकीचं बिगुल वाजलं! निवडणूक तारखा जाहीर

On: November 4, 2025 4:34 PM
Elections
---Advertisement---

Elections 2025 Announced | महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर अधिकृत घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (4 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सर्वच पक्षांनी तयारीसाठी कंबर कसली आहे.

या निवडणुका डिसेंबर 2025 मध्ये होणार असून, आयोगाने संपूर्ण कार्यक्रम वेळापत्रकासह जाहीर केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर उमेदवारांची हालचाल आणि कार्यकर्त्यांची गडबड सुरू झाली आहे.

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर :

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

नामनिर्देशन दाखल: 10 नोव्हेंबर 2025

नामनिर्देशनाची अंतिम मुदत: 17 नोव्हेंबर 2025

छाननी: 18 नोव्हेंबर 2025

अर्ज माघारी घेण्याची तारीख: 21 नोव्हेंबर 2025

निवडणूक चिन्ह वाटप: 26 नोव्हेंबर 2025

मतदानाचा दिवस: 2 डिसेंबर 2025

मतमोजणीचा दिवस: 3 डिसेंबर 2025

या सर्व निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने (Multi-member System) घेण्यात येणार आहेत. नगर परिषदेच्या प्रत्येक वॉर्डात दोन किंवा तीन जागांसाठी मतदान होईल.

ईव्हीएमवर मतदान आणि पारदर्शकतेसाठी नवीन नियम :

निवडणूक आयोगाने या निवडणुका ईव्हीएम (EVM) द्वारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि मतदारांना सोयीस्कर सुविधा देण्यासाठी आयोगाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

उमेदवारांची खर्च मर्यादा: नगर पंचायतीसाठी 2 लाख रुपये ठरवण्यात आले आहेत.

मतदार माहिती ॲप: आयोगाने मतदारांना त्यांच्या नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी एक खास मोबाईल ॲप जारी केले आहे.

दुबार मतदारांवर लक्ष: दुबार नाव असलेल्या मतदारांच्या याद्यांवर “डबल स्टार ()”** चिन्ह असेल. अशा मतदारांची स्वतंत्र यादी प्रसिद्ध केली जाईल आणि संबंधितांकडून लेखी हमी घेतली जाणार आहे.

या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील राजकारणात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झालं आहे. सर्वच राजकीय पक्ष आता नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी प्रचारयंत्रणा सक्रिय करण्याच्या तयारीत आहेत.

News Title: Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Elections 2025 Announced: Poll schedule for 246 councils and 42 town panchayats declared

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now