महाराष्ट्राचा खासदार युद्धभूमीत अडकला! परदेश दौऱ्यावर असताना भीषण प्रसंग

On: March 2, 2026 7:09 PM
Iran Israel War
---Advertisement---

Iran Israel War | इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या संघर्षाचे पडसाद आखाती देशांपर्यंत पोहोचले असून दुबईसह अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. या गोंधळात भारतातील अनेक नागरिक अडकले असून महाराष्ट्रातील एका खासदाराचाही यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

दुबईत युद्धजन्य परिस्थिती, भारतीय अडकले :

इस्रायल (Israel) आणि अमेरिका (United States of America) यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराण (Iran) कडून जोरदार कारवाई सुरू आहे. इराणने दुबई (Dubai) तसेच इतर आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. यासोबतच काही महत्त्वाच्या इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे आखाती भागात तणाव निर्माण झाला असून सर्वत्र असुरक्षिततेची भावना पसरली आहे.

या युद्धसदृश परिस्थितीचा थेट परिणाम विमानसेवांवर झाला आहे. यूएई (UAE) मध्ये अनेक ठिकाणी उड्डाणे रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी विविध शहरांमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये जालना मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) हे दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली. नातेवाईकांसोबत खासगी दौऱ्यावर असताना विमानसेवा बंद झाल्याने ते परत येऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले.

Iran Israel War | खासदारांच्या सुरक्षिततेबाबत कार्यालयाची माहिती :

खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने या संदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले की, खासदार काळे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परिवारासह दुबईत गेले असून त्यांचा कार्यालयाशी नियमित संपर्क सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या पोस्टमध्ये पुढे असेही नमूद करण्यात आले की, त्यांच्या प्रकृती किंवा सुरक्षिततेबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. कार्यकर्ते, नागरिक आणि हितचिंतकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. युद्धजन्य बातम्यांमुळे गैरसमज पसरू नयेत यासाठी कार्यालयाने ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले. (Iran Israel War)

दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर केवळ खासदारच नव्हे तर सामान्य नागरिकही अडचणीत सापडले आहेत. नागपूर (Nagpur) येथील चिकटे आणि घारफेंडे कुटुंबातील नऊ जण पर्यटनासाठी दुबईत गेले होते. त्यांचे ३ मार्च रोजी परतीचे नियोजन होते; मात्र विमानतळ बंद झाल्याने ते तिथेच अडकले. सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना हॉटेलबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून हॉटेल प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मिसाईल हल्ल्यांच्या भीतीमुळे वातावरण तणावपूर्ण असून या पर्यटकांनी सरकारकडे सुरक्षित परतीसाठी मदतीची मागणी केली आहे.

News Title: Maharashtra MP kalyan kale Stuck Amid War

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now