आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी

On: May 21, 2024 8:42 AM
HSC Result
---Advertisement---

HSC Result l महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 12वीचा निकाल आज म्हणजेच 21 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली आहे.

आज दुपारी 1 वाजता लागणार निकाल :

विद्यार्थ्यांना निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहावा लागणार आहे. म्हणजेच विद्यार्थी mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहून व डाउनलोड करू शकतील. त्यांचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर टाकावा लागेल.

याशिवाय तुम्ही तुमचा निकाल https://mahahsscboard.in/mr या लिंकद्वारे देखील थेट पाहू शकता. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. गेल्या वर्षी 12वीचा निकाल 25 मे रोजी लागला होता. मात्र यंदाच्या वर्षीचा निकाल आज म्हणजेच 21 मे ला लागणार आहे.

HSC Result l या वेबसाईटवर पाहा निकाल :

गेल्या वर्षी दहावीच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली होती. जेथे 2023 मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 93.83 इतकी नोंदवली गेली होती. तर 2022 मध्ये हे प्रमाण 96.94 टक्के होते. गेल्या वर्षी बारावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२५ होती. 2022 मध्ये ही घट 94.22 टक्के होती. गतवर्षी विज्ञान शाखेचे विद्यार्थी ९६.०९ टक्के, तर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.४२ टक्के होते. तर कला शाखेत हे प्रमाण ८४.०५ टक्के होते.

mahahsscboard.maharashtra.gov.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsc.in
mahahsscboard.in

News Title – Maharashtra HSC Result 2024 

महत्त्वाच्या बातम्या

पोर्शे दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या

या राशीच्या व्यक्तींचा गैरसमजातून वाद वाढू शकतो

बजरंग सोनवणे बीडच्या स्ट्राँगरूममध्ये धडकले, काय घडलं नेमकं?

युवकाने तब्बल आठ वेळा भाजपला केलं मतदान, व्हिडीओ आला समोर

निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतंय काय?; उद्धव ठाकरे भडकले

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now