‘लाडकी बहिण’ योजनेतील 9 लाख महिलांना फटका, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

On: February 21, 2025 12:01 PM
Maharashtra Govt to Remove 9 Lakh Names from Ladki Bahin Yojana Scheme 
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण’ (Ladki Bahin Yojana) योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक वाईट बातमी आहे. राज्य सरकारने 9 लाख महिलांची नावे योजनेतून काढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होणार आहे. याआधीच 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते, आणि आता आणखी 4 लाख नावे हटवली जाणार आहेत.

अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू

सरकारच्या माहितीनुसार, योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी पुनरावलोकन सुरू आहे. आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार ही संख्या 15 लाखांपर्यंत पोहोचू शकते. सरकारच्या या निर्णयामुळे, राज्य सरकारला 945 कोटी रुपयांची बचत होईल, असे सांगण्यात आले आहे.

लाभार्थ्यांसाठी नवीन निकष आणि ई-केवायसी बंधनकारक

यापुढे ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार नवीन निकष लागू करणार आहे. लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ‘ई-केवायसी’ आणि जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जोडणे बंधनकारक असेल. सरकारच्या नव्या निर्णयामुळे, या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

काय आहे ‘लाडकी बहिण’ योजना?

या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, विधवा, सोडून दिलेल्या किंवा निराधार महिलांना तसेच ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.  (Ladki Bahin Yojana)

2.5 कोटी महिलांची नोंदणी, पण पात्रतेची तपासणी सुरू

आतापर्यंत सुमारे 2.5 कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे, पण सरकारकडून आता अपात्र लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत आल्यानंतर, महायुती सरकारने (Mahayuti Government) 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.  याबाबत आता येत्या अर्थसंकल्पात (Budget) घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या या निर्णयावर महिलांची प्रतिक्रिया काय असेल, आणि अपात्र लाभार्थ्यांवर पुढे कोणती कारवाई होईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Title : Maharashtra Govt to Remove 9 Lakh Names from Ladki Bahin Yojana Scheme 

 

Join WhatsApp Group

Join Now