विद्यार्थ्यांसह नागरिकांना महसूलमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!

On: July 6, 2025 11:12 AM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra | महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जात, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्व व रहिवासी प्रमाणपत्रांसाठी लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत हा निर्णय जाहीर करत लाखो नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

स्वसाक्षांकित अर्जालाच मान्यता, अर्ज आता साध्या कागदावर :

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दहावी-बारावीच्या निकालांनंतर विविध शासकीय योजनांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर घेण्याची गरज नाही. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भारातून मुक्ती मिळणार आहे.

हव्या त्या प्रमाणपत्रांसाठी यापुढे फक्त स्वसाक्षांकित अर्ज सादर केल्यास पुरेसे ठरणार आहे. म्हणजेच, साध्या कागदावर लिहिलेला अर्ज स्वतःच्या सहीसह तहसील कार्यालयात सादर केला की प्रमाणपत्रे मिळणार. याआधी शपथपत्र सादर करताना 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर अनिवार्य होता. ही रक्कम अनेक कुटुंबांसाठी आर्थिक अडचण बनली होती.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “पूर्वी 100 रुपयांचे शुल्क होते, परंतु वाढवून 500 रुपये करण्यात आले होते. आता मात्र नागरिकांच्या हितासाठी हे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असून याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.”

Maharashtra | तात्काळ अंमलबजावणी आणि महसूलमंत्र्यांचा अभिनंदनीय निर्णय :

राज्यातील लाखो विद्यार्थी, बेरोजगार तरुण, ग्रामीण भागातील नागरिक, विविध योजनांचे लाभार्थी यांना आता शपथपत्रासाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी गरजेची असलेली कागदपत्रे सहज मिळवता येणार आहेत.

हा निर्णय केवळ आर्थिक दिलासा नाही तर प्रशासकीय प्रक्रियेतही सुलभता निर्माण करणारा आहे. यामुळे शासकीय यंत्रणा अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

News Title: Maharashtra Government Waives ₹500 Stamp Duty on Affidavits for Students and Citizens

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now