सावधान! फेक अकाउंट काढून ट्रोल केल्यास तर थेट पोलीस कोठडी; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

On: March 10, 2026 4:26 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | सोशल मीडियावर फेक अकाउंट्सच्या माध्यमातून होणारी बदनामी आणि ट्रोलिंग रोखण्यासाठी राज्य सरकार आता सक्रिय झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीला आणि बदनामीकारक मजकुराला आळा घालण्यासाठी सरकार विशेष पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर अनेक फेक अकाउंट्सच्या माध्यमातून व्यक्ती किंवा संस्थांची बदनामी करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आता या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी कडक धोरण आखण्याची तयारी सुरू केली आहे.

पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती :

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात भाजप आमदार राहुल कुल यांनी सोशल मीडियावरील बदनामीचा मुद्दा उपस्थित केला. फेक अकाउंट्सच्या माध्यमातून अनेकांची प्रतिमा मलीन केली जाते आणि समाजात चुकीची माहिती पसरवली जाते, असे त्यांनी सभागृहात नमूद केले.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती सध्याच्या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे का किंवा नवीन स्वतंत्र कायदा आणण्याची गरज आहे का, याचा सखोल अभ्यास करणार आहे.

Devendra Fadnavis | सोशल मीडियावरील फेक अकाउंट्सवर कारवाईची शक्यता :

सोशल मीडियावर फेक अकाउंट्सच्या माध्यमातून अनेकदा द्वेषपूर्ण मजकूर, चिथावणीखोर पोस्ट आणि खोटी माहिती प्रसारित केली जाते. यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही सरकारने नमूद केले आहे. (Devendra Fadnavis News)

सरकारकडून स्थापन होणारी समिती या सर्व बाबींचा अभ्यास करून ठोस शिफारसी करणार आहे. त्यानंतर सोशल मीडियावर फेक अकाउंट्स चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात सोशल मीडियावर फेक अकाउंट्सद्वारे ट्रोलिंग करणाऱ्यांवर सरकारचा अंकुश बसू शकतो.

News Title: Maharashtra Government Plans Strict Action on Fake Social Media Accounts, Says Devendra Fadnavis

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now