निराधार बालकांना महायुतीचा आधार मिळणार! सरकारने केली नवीन योजना सुरु

On: August 6, 2025 3:14 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Bal Sangopan Yojana | राज्यातील अनाथ, निराश्रित व बेघर मुलांकरिता महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना’ अंतर्गत संस्थात्मक संगोपनाऐवजी कौटुंबिक आधार देण्यावर भर दिला जात आहे. 0 ते 18 वयोगटातील अनाथ मुला-मुलींचा विकास सुरक्षित वातावरणात व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेद्वारे संबंधित मुलांना संस्थेत ठेवण्याऐवजी पर्यायी पालक किंवा कुटुंब देण्यात येईल. त्यामध्ये मुलांचा सांभाळ, शिक्षण, आरोग्य आणि भावनिक विकास नैसर्गिक कौटुंबिक वातवरणात होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. (Bal Sangopan Yojana)

थेट खात्यावर लाभ; 2250 रुपये दरमहा मिळणार :

महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून या योजनेत लाभ घेणाऱ्या मुलांना दर महिन्याला रु. 2250 इतका थेट लाभ दिला जाणार आहे. ‘थेट लाभ हस्तांतरण’ (Direct Benefit Transfer – DBT) पद्धतीने हा निधी मुलांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी एक्स द्वारे दिली.

या उपक्रमासाठी एकूण रु. 101.46 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर मिळावा, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कौटुंबिक वातावरणात संगोपन करताना आर्थिक मदत मिळाल्यामुळे हे कुटुंबदेखील समर्थ होणार आहेत.

Bal Sangopan Yojana | महायुती सरकारचा मोठा सामाजिक निर्णय :

या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मान्यता मिळालेली आहे. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शासनाचा लाभ थेट पोहोचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. (Bal Sangopan Yojana)

संस्थेत राहत असलेल्या मुलांना अपुरं प्रेम, माया मिळते, हे लक्षात घेता त्यांना कौटुंबिक आधार देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. भविष्यात हे बालक समाजाचे जबाबदार नागरिक होतील, अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे.

News Title: Maharashtra Government Approves ₹2250 Monthly Aid Under Bal Sangopan Yojana

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now