महाराष्ट्रावर दुहेरी संकट, पुढील 6 दिवस अत्यंत धोक्याचे

On: December 27, 2025 11:16 AM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | डिसेंबर महिना संपत आला असून अवघ्या काही दिवसांत नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. मात्र नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरच महाराष्ट्रावर थंडीचं मोठं संकट घोंगावत आहे. राज्यात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढत असून रात्री व पहाटे हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. दिवस चढल्यावर सूर्यप्रकाशामुळे थोडा उबदारपणा जाणवत असला, तरी संपूर्ण राज्यात थंडीचा प्रभाव कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे काही दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात थंडीचा जोर वाढलेला असतानाच दुसरीकडे हवेच्या गुणवत्तेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. काही भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 195 पर्यंत पोहोचला असून ही पातळी ‘अती वाईट’ श्रेणीत मोडते. त्यामुळे नागरिकांना दूषित हवेत श्वास घ्यावा लागत असून आरोग्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरत आहे. थंडी आणि हवेतील प्रदूषण अशा दुहेरी संकटाचा सामना महाराष्ट्राला करावा लागत आहे.

राज्यात वाढला थंडीचा कडाका :

उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट सक्रिय झाल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रावरही उमटताना दिसत आहेत. उत्तर व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले असून नागरिकांना तीव्र गारठा सहन करावा लागत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काहीच दिवस उरले असताना, हवामानातील हा बदल सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. (Cold Wave Maharashtra)

भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये 1 जानेवारी 2026 पर्यंत दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळू शकते.

Maharashtra Weather Update | तापमानाचा पारा घसरला, प्रदूषणात वाढ :

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. 27 डिसेंबर रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. मुंबईतही गुलाबी थंडीचा अनुभव नागरिक घेत असून दाट धुकं आणि थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील सहा दिवस किमान तापमान सुमारे 18 अंश सेल्सिअस राहणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ थंडी, तर दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा घसरलेलाच राहणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

News Title: Maharashtra Faces Double Weather Threat: Cold Wave and Rising Air Pollution, IMD Warns for Next 6 Days

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now