Maharashtra Board Result 2024 | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाची आतुरता आहे. सगळ्यांचे लक्ष फक्त निकालाच्या तारखेवर लागलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात निकालाबाबतच प्रश्न निर्माण होत आहेत. आता बोर्डाने महत्वाची अपडेट दिली आहे.
दरवर्षीच्या अंदाजानुसार महाराष्ट्र बोर्डातफे सर्वात अगोदर बारावीचा व मग त्यानंतर 10 दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जातो. यंदा मे महिन्याची सुरुवात झाल्यापासूनच HSC च्या निकालाच्या तारखांबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात आले होते.
25 मेला निकाल लागणार?
बारावीचा निकाल हा 10 मे रोजी जाहीर होईल, असं म्हटलं जात होतं. आता 25 मे ही तारिख चर्चेत आली आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर केला जात असल्याने 25 मे रोजी निकाल घोषित केला जाण्याची दाट शक्यता आहे.मात्र, याबाबत अधिकृत अशी कोणतीच घोषणा झाली नाहीये.
विद्यार्थ्यांनी ‘या’ लिंकवर निकाल पाहावा
-mahresult.nic.in
-mahahsscboard.in
-hsc.mahresults.org.in
https://www.digilocker.gov.in/
या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे. यानंतर हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.यानंतर निकाल तुमच्या समोर दिसेल. निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवावी.तुम्हाला भविष्यात ती कमी येईल.
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीची (Maharashtra Board Result 2024) परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाली. तर, इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च या कालावधीत पार पडली. यावेळी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर, दहावीच्या परीक्षेत जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले होते. आता विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत.
News Title- Maharashtra Board Result 2024 update
महत्वाच्या बातम्या-
“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?
राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा
“ईडीने जप्त केलेले पैसे मी गोरगरिबांना देणार”, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
कोवॅक्सिन लसीने चिंता वाढवली; नागरिकांमध्ये आढळतायेत हे गंभीर आजार
“आई-वडिलांच्या भांडणांमुळे शाळेत लाज..”; रणबीर कपूरने केला खुलासा






