स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ७० हजार जागांवर मेगाभरती

On: February 10, 2026 7:36 PM
Maharashtra Recruitment 2026
---Advertisement---

Maharashtra Recruitment 2026 | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने प्रशासनात मनुष्यबळ वाढवण्यासाठी तब्बल 70 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही घोषणा केली असून, येत्या काळात हजारो उमेदवारांना शासकीय सेवेत प्रवेशाची संधी मिळणार आहे.

डिजिटल आणि पारदर्शक भरती प्रक्रियेवर भर :

या भरतीपैकी सुमारे 20 हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार आहेत, तर उर्वरित पदे विविध शासकीय विभाग आणि स्वायत्त संस्थांमधून भरली जातील. सेवा प्रवेश नियमावलीत आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असून, आधुनिक प्रशासनाच्या गरजेनुसार कौशल्याधारित भरतीवर भर दिला जाणार आहे. (Maharashtra Recruitment 2026)

भरती प्रक्रियेत विलंब, गैरव्यवहार आणि कागदपत्रांच्या झंझटीपासून मुक्ती मिळावी यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रमाणपत्र पडताळणीसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिलॉकर प्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याने उमेदवारांसाठी प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि विश्वासार्ह ठरणार आहे.

Maharashtra Recruitment 2026 | प्रशासनाची कार्यक्षमता वाढणार :

70 हजार पदे भरल्यानंतर राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासनाची गती आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. (Maharashtra Recruitment 2026)

भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही, यासाठी संपूर्ण यंत्रणा पारदर्शक ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्र शासनाचं मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल राष्ट्रीय स्तरावर प्रशंसनीय ठरल्याचंही त्यांनी सांगितलं.

News Title: Maharashtra Announces 70,000 Government Jobs in 2026, 20,000 Through MPSC

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now