महादेव मुंडेंच्या हत्येमागे कोणाचा हात?, सुरेश धसांच्या आरोपांनी खळबळ

On: February 22, 2025 4:17 PM
Suresh Dhas Allegation
---Advertisement---

Mahadev Munde Murder | भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी परळी दौऱ्यावर असताना महादेव मुंडे (Mahadev Munde Murder) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कुटुंबीय भावनिक झाले, तर सुरेश धस यांनी हत्येच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांवर थेट आरोप केले.

“गाडी गायब, पण मृतदेह जागेवर?”

महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. “महादेव मुंडे यांचा खून झाला, पण पोलिसांनी गाडी हलवली आणि मृतदेह तिथेच राहू दिला. म्हणजे यात पोलिसांचा हात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी भास्कर केंद्रे, सचिन सानप आणि गोविंद भताने या पोलिस अधिकाऱ्यांची नावे घेत “हे अधिकारी वारंवार या प्रकरणात चर्चेत येत आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

परळीतील वाढत्या गुन्हेगारीवर नाराजी व्यक्त करताना धस यांनी शहरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात असल्याचे सांगितले. “परळीत ३५ लाख रुपये दिले की कोणीही खून करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस तपासासाठी आहेत की गुन्हेगारांना मदत करण्यासाठी?” असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, “महादेव मुंडे यांचा प्लॉट कुणी घेतला आणि तो नंतर कुणाच्या नावावर गेला, हे तपासले पाहिजे. यात मोठा घोटाळा असल्याची शक्यता आहे.”

“१०० टक्के यात आकाचा हात!”

या प्रकरणात १०० टक्के आकाचा हात असल्याचा दावा करत धस यांनी अप्रत्यक्षपणे वाल्मिक कराडवर (Walmik Karad) निशाणा साधला. “हा खून पोलिसांनी केला किंवा आकाच्या आदेशावर झाला. रात्री ८ वाजता कोर्टासमोर महादेव मुंडे यांचा खून झाला. आकाच्या आकाचा हात नसेल, पण आकाचा हात नक्कीच आहे!” असे ते म्हणाले. (Mahadev Munde Murder)

धस यांना परळीमध्ये काळे झेंडे, आंदोलनाचा विरोध

सुरेश धस यांच्या या आरोपांमुळे परळीतील वातावरण तापले आहे. परळीमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आणि काळे झेंडे दाखवण्यात आले. “सुरेश धस हे परळीला बदनाम करत आहेत,” असा आरोप आंदोलकांनी केला.

Title : Mahadev Munde Murder Suresh Dhas Alleges Police and Political Involvement

 

Join WhatsApp Group

Join Now