Mahadev Betting App | देशभर गाजलेल्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आता नवीनच खुलासा समोर आला आहे. याचं थेट पुणे कनेक्शन असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी नारायणगाव येथील एका मोठ्या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना ताब्यात घेतलंय. यासोबतच अजून 70 जणांना ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, अभिनेता रणबीर कपूर यांची नावे समोर आली होती. यात बॉलीवूडमधील अनेक जण रडारवर होते. या प्रकरणी पुण्यातही धागेदोरे आढळले आहेत.
महादेव बेटिंग प्रकरणात देशातील विविध राज्यांसह परदेशातही कारवाई करण्यात आली होती. आता पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे छापेमारी केली आहे. येथील नारायणगावमधील एका इमारतीमधून याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्तीसगडमधील भिलाई येथील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी महादेव बेटिंग ॲप सुरु केलं. दुबईत या ॲपसाठी सगळं काम केलं जाई. त्यांनी मलेशिया, थायलंड, भारत आणि UAE मध्ये कॉल सेंटर्स उघडली होती. त्या माध्यमातून ऑनलाइन सट्टेबाजी केली जात होती.या ऑनलाईन बेटिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे मनी लाँडरिंग (Mahadev Betting App) त्यांनी केल्याचं उघड झालं आहे.
सौरभ चंद्राकर याने अनिल आणि सुनील दमानी यांच्या मदतीने बोगस बँक अकाऊंट्स उघडली असल्याची माहिती आहे. या बेटींग ॲपमध्ये बड्या व्यक्तींना कमिशन देण्यात आल्याचंही म्हटलं जातंय. मागच्या वर्षी याचा फाऊंडर सौरभ चंद्राकर याने दुबईत लग्न केलं. त्याच्या लग्नात बॉलीवूडमधील कलाकारांना चार्टर्ड प्लेनने आणण्यात आलं होतं. आता या ॲप प्रकरणी तपास केला जात आहे.
News Title- Mahadev Betting App Pune Connection 70 People Arrested
महत्वाच्या बातम्या-
चाणक्यांचे ‘हे’ 3 बहुमूल्य नियम पाळा; जीवनात यशाचं सर्वोच्च शिखर गाठाल
मोदींना जिरेटोप घातल्याने उफळला वाद; प्रफुल पटेलांची पोस्ट चर्चेत मात्र माफी नाहीच
“राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, एका इव्हेंटचे किती पैसे घेतात?”
सिद्धू मूसेवालाच्या आईने 59 वा वाढदिवस केला साजरा, पोस्ट व्हायरल
“…त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य उरणार नाही”; PM मोदी असं का म्हणाले?






