युद्ध भडकलं अन् घरात गॅसचा तुटवडा! सिलिंडरसाठी देशात हाहाकार; मोदी सरकारने घेतले ‘हे’ 10 मोठे निर्णय

On: March 19, 2026 6:44 PM
LPG Subsidy
---Advertisement---

LPG Shortage | इराण (Iran) आणि इस्रायलमधील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) होणारा पुरवठा विस्कळीत झाला असून भारतात एलपीजीचा (LPG) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्र सरकारने (Central Government) परिस्थिती हाताळण्यासाठी कंबर कसली असून पुढील दहा दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

गॅस टंचाईची भीषणता आणि काळाबाजारावर कारवाई

सध्या देशातील गॅस टँकर्स युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्रात अडकून पडले आहेत, ज्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पुरवठा साखळीतील हा अडथळा दीर्घकाळ राहण्याची शक्यता असल्याने सरकारने नागरिकांना इंधन जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. गॅस सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारने मोठी कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत 12,000 हून अधिक ठिकाणी छापे टाकून 15,000 पेक्षा जास्त सिलिंडर जप्त केले आहेत.

या कठीण काळात काही ठिकाणी 3000 रुपयांपर्यंत चढ्या दराने सिलिंडरची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी सरकारने घरगुती गॅस उत्पादनात 40 टक्क्यांनी वाढ केली आहे. तसेच, स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून राज्यांना 48,000 किलोलीटर जादा केरोसीनचा (Kerosene) पुरवठा करण्यात आला आहे, जेणेकरून गरिबांची चूल पेटती राहील.

पीएनजीचा विस्तार आणि पर्यायी पुरवठा योजना

एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (Ministry of Petroleum and Natural Gas) आता पाईपलाईन नैसर्गिक वायू अर्थात पीएनजी (PNG) नेटवर्कवर भर देत आहे. सहसचिव सुजाता शर्मा (Sujata Sharma) यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या शहरांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, तिथे ग्राहकांनी त्वरित जोडणी घ्यावी. पीएनजी ग्राहकांना त्यांचे एलपीजी सिलिंडर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून ते गॅस इतर गरजांसाठी वापरता येतील.

शहरी भागातील व्यावसायिक वापरासाठी पीएनजीला प्रोत्साहन दिले जात असून, जे राज्य या जाळ्याचा विस्तार वेगाने करतील त्यांना व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यात 30 टक्क्यांपर्यंत वाढ देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. दरम्यान, सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) कडून होणाऱ्या आयातीत अडथळे आले असले तरी, ‘शिवालिक’ (Shivalik) आणि ‘नंदा देवी’ (Nanda Devi) हे टँकर भारतात पोहोचल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी घाबरून बुकिंग करू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp Group

Join Now