LPG Price | आज 18 जून रोजी घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नसल्याने मागील महिन्याचे दरच कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील विविध शहरांमध्ये एलपीजीच्या किमतींमध्ये मोठी तफावत कायम असून काही जिल्ह्यांमध्ये 14.2 किलोचा सिलिंडर हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.
शहरागणिक एलपीजी दरांमध्ये मोठा फरक :
देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर एकसमान नसून वाहतूक खर्च, भौगोलिक परिस्थिती आणि वितरण व्यवस्थेवर त्यांचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. मुंबई (Mumbai) येथे 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांना ₹941.50 मोजावे लागत आहेत. तर दुर्गम भागांमध्ये हा खर्च लक्षणीयरीत्या वाढतो. लडाख (Ladakh) मधील लेह (Leh) येथे याच सिलिंडरची किंमत ₹1179 पेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरांमधील एलपीजी दर पाहिले तर पुणे (Pune) येथे सिलिंडर 945 रुपये तर नाशिक (Nashik) येथे 945.50 रुपये आहे. तसेच अहिल्यानगर येथे 955.50 रुपये आणि नागपूर (Nagpur) येथे 993.50 रुपये इतका आहे. याशिवाय भंडारा (Bhandara) आणि वर्धा (Wardha) येथे दर 1002 रुपये इतके असून गोंदिया (Gondia) मध्ये 1010.50 रुपये आणि गडचिरोली (Gadchiroli) येथे 1011.50 रुपये दराने सिलिंडर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये गॅस सिलिंडरचा खर्च हजार रुपयांच्या पुढे पोहोचला आहे.
LPG Price | व्यावसायिक सिलिंडर आणि पीएनजीचे दर :
हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्येही मोठा फरक दिसून येत आहे. देशातील काही दुर्गम भागांमध्ये व्यावसायिक सिलिंडरसाठी 3500 ते 3750 रुपये पर्यंत खर्च करावा लागत आहे.
याउलट मुंबईमध्ये 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 3067.50 रुपये असून प्रमुख शहरांच्या तुलनेत हा दर कमी मानला जातो.






