Budget 2026 | देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर होण्याच्या मुहूर्तावरच भारतीय जनतेला महागाईचा तीव्र फटका बसला आहे. इंधन विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केल्याने गृहिणी आणि व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
किती रुपयांनी दर वढले?
आजपासून (Budget 2026) देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरचा वापर करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी या सिलेंडरच्या दरात थेट ५० रुपयांची वाढ केली असून, यामुळे हॉटेल आणि केटरिंग व्यवसाय महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात अशा प्रकारे किमती वाढल्याने बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात देखील या दरांमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी १११ रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मुंबई (Mumbai) शहरात आता या सिलेंडरसाठी १६९२ रुपये मोजावे लागणार आहेत, तर देशाची राजधानी दिल्ली (Delhi) येथे हाच दर १७४०.५० रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात (Kolkata) १८४४.५० रुपये आणि चेन्नई (Chennai) शहरात १८९९.५० रुपये अशा नवीन किमती लागू झाल्या आहेत.
घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर तूर्तास स्थिर
व्यावसायिक (Budget 2026) सिलेंडर महागले असले तरी, घरगुती वापरासाठी लागणाऱ्या १४ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारी ही एकमेव बाब असून, ८ एप्रिल २०२५ रोजी जे दर निश्चित करण्यात आले होते, तेच आजही कायम ठेवण्यात आले आहेत. घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही हस्तक्षेप न केल्याने मध्यमवर्गीयांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
सध्याच्या दरपत्रकानुसार, घरगुती गॅस सिलेंडर मुंबईत ८५२ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच दिल्लीत यासाठी ८५३ रुपये, कोलकात्यात ८७९ रुपये आणि चेन्नईमध्ये ८६८ रुपये द्यावे लागत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या या बदलांमुळे व्यावसायिक स्तरावर महागाई वाढण्याची चिन्हे असली, तरी घरगुती बजेटवर त्याचा थेट परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
News Title – LPG Cylinder Prices Rise on Union Budget Day






