LPG Cylinder Booking Problem | घरगुती गॅस सिलिंडरबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक ग्राहकांना LPG सिलिंडर बुक करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी बुकिंग होत नाही, तर काही ठिकाणी बुकिंग झाल्यानंतरही डिलिव्हरी उशिरा मिळत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना वारंवार गॅस एजन्सीचे चकरा माराव्या लागत आहेत.
दरम्यान, जर तुम्हालाही 25 दिवस उलटून गेल्यानंतरही सिलिंडर बुक करता येत नसेल किंवा डिलिव्हरी मिळत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. अशा वेळी ग्राहकांकडे तक्रार नोंदवण्याचे काही अधिकृत पर्याय उपलब्ध आहेत. योग्य पद्धतीने तक्रार केल्यास संबंधित विभागाकडून तुमची समस्या सोडवली जाऊ शकते.
LPG सिलिंडर बुकिंगमध्ये अडचण का येते? :
अलीकडच्या काळात गॅस सिलिंडरच्या व्यवस्थापनासाठी काही नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार घरगुती LPG सिलिंडरच्या दोन बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही नुकताच सिलिंडर घेतला असल्यास 25 दिवस पूर्ण होण्यापूर्वी नवीन बुकिंग स्वीकारले जात नाही. (PG Portal Complaint)
अनेक ग्राहकांना या नियमाची माहिती नसल्याने ते वारंवार बुकिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. याशिवाय एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वापरकर्ते अॅप किंवा वेबसाइटवर लॉगिन करत असल्याने सिस्टम स्लो होऊ शकते. त्यामुळे बुकिंग प्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात.
LPG Cylinder Booking Problem | तक्रार कशी करावी? :
जर तुमची समस्या नियमांमुळे नसून तरीही एजन्सीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर तुम्ही सरकारी PG (Public Grievance) पोर्टलवर थेट तक्रार नोंदवू शकता. या पोर्टलवर केलेली तक्रार थेट संबंधित मंत्रालय आणि विभागापर्यंत पोहोचते. (LPG Cylinder Booking Problem)
तक्रार करण्यासाठी पोर्टलवर लॉगिन करून ‘सार्वजनिक तक्रार नोंदवा’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित विभाग निवडून आपली समस्या सविस्तर लिहावी. तसेच ग्राहक क्रमांक आणि गॅस एजन्सीची माहिती भरून तक्रार सबमिट करावी. यानंतर तुम्ही तक्रारीचा स्टेटस देखील ऑनलाइन ट्रॅक करू शकता.
हेल्पलाइनवरूनही मिळू शकते मदत :
ऑनलाइन तक्रार करणे शक्य नसेल तर ग्राहक हेल्पलाइन नंबरवर कॉल करूनही आपली समस्या नोंदवू शकतात. इंडेन गॅस आणि HP गॅस ग्राहकांसाठी 1800-2333-555 हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तर भारत गॅस ग्राहक 1800-22-4344 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. (LPG Gas Complaint Online Number)
सरकारच्या माहितीनुसार देशात LPG चा कोणताही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जर बुकिंग किंवा डिलिव्हरीमध्ये अडचण येत असेल तर योग्य माध्यमातून तक्रार करून ती लवकर सोडवता येऊ शकते.






