गॅस सिलिंडर संदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का?

On: April 7, 2026 1:38 PM
LPG Crisis Update
---Advertisement---

LPG Crisis Update | जागतिक पातळीवर वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता ऊर्जा क्षेत्रावरही दिसून येत आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा फटका अनेक देशांना बसत आहे. महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली असून भारतातही एलपीजी पुरवठ्याबाबत चिंता वाढू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातील स्थलांतरित कामगारांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या 5 किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडरचा पुरवठा दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांना स्वयंपाकासाठी गॅस सहज उपलब्ध होणार असून दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थलांतरित कामगारांसाठी विशेष योजना :

सरकारच्या या निर्णयानुसार प्रत्येक राज्यातील स्थलांतरित कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या 5 किलोच्या एफटीएल गॅस सिलिंडरची संख्या वाढवण्यात आली आहे. हे अतिरिक्त सिलिंडर राज्य सरकारे आणि त्यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांना दिले जाणार आहेत. त्यानंतर तेल विपणन कंपन्यांच्या माध्यमातून हे सिलिंडर थेट कामगारांना वितरित केले जातील. (5 Kg LPG Cylinder Scheme)

सरकारच्या अंदाजानुसार या उपक्रमामुळे 5 किलोच्या एफटीएल सिलिंडरची दररोजची विक्री एक लाखांहून अधिक होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 23 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 6.6 लाख लहान सिलिंडरची विक्री करण्यात आली आहे.

LPG Crisis Update | सरकारची कारवाई आणि पर्यायी उपाय :

एफटीएल म्हणून ओळखले जाणारे हे 5 किलोचे लहान गॅस सिलिंडर बाजारभावाने उपलब्ध असतात. महत्त्वाची बाब म्हणजे हे सिलिंडर खरेदी करण्यासाठी पत्त्याचा पुरावा आवश्यक नसतो. त्यामुळे स्थलांतरित कामगारांना किंवा तात्पुरत्या स्वरूपात राहणाऱ्या लोकांना ते सहज उपलब्ध होऊ शकतात.

दरम्यान सरकारने नागरिकांना एलपीजीऐवजी पीएनजी कनेक्शनचा पर्याय स्वीकारण्याचेही आवाहन केले आहे. तसेच गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठीही कठोर पावले उचलण्यात आली आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत 50 हजारांहून अधिक सिलिंडर जप्त करण्यात आले असून 1,400 पेक्षा अधिक वितरकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याशिवाय 36 गॅस डीलरशिप निलंबित करण्यात आल्या आहेत. (LPG Cylinder Update)

पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार देशभरात दररोज मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे. एका दिवसात 51 लाखांहून अधिक सिलिंडरचे वितरण करण्यात आले असून एकूण मागणीपैकी सुमारे 95 टक्के मागणी ऑनलाइन बुकिंगद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

News Title: LPG Crisis Update: Central Government Doubles Supply Of 5 Kg LPG Cylinders For Migrant Workers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now