हॉटेलमध्ये बोलवून दिला दगा; गर्लफ्रेंडचं धक्कादायक कांड, बॉयफ्रेंडच्या पायाखालची जमीन सरकली

On: February 21, 2025 12:15 PM
Love Trap Youth Kidnapped 20 Lakh Ransom Demanded 
---Advertisement---

Love Trap | प्रेमात विश्वास हा नात्याचा आधार असतो, पण याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवतीने डेहराडून (Dehradun) येथील युवकाशी मैत्री केली. सोशल मीडियावरून (Social Media) त्यांचे प्रेमसंबंध वाढले आणि दोघांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली. (Love Trap)

प्रेमाचे नाटक आणि हॉटेलमधील भेट

युवक तिच्या प्रेमात इतका गुंतला की, तिने भेटायला बोलावल्यावर तो पानिपतला (Panipat) पोहोचला. युवतीने त्याला हॉटेलमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हरियाणातील (Haryana) पानिपतमध्ये घडलेल्या या प्रकरणात, युवकाने कोणताही विचार न करता पानिपतमधील एका हॉटेलमध्ये खोली बुक केली. तो हॉटेलबाहेर प्रेयसीची वाट पाहत होता.

अपहरण आणि खंडणीची मागणी

प्रेयसी येताच दोघे खोलीत जाणार इतक्यात, अचानक चार तरुण तिथे आले आणि त्यांनी दोघांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मुलीला नंतर सोडून दिले, पण युवकाला घेऊन ते पसार झाले. त्यानंतर त्यांनी युवकाच्या कुटुंबीयांकडे फोन करून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली.

पोलिसांची कारवाई आणि मास्टरमाइंडचा शोध

पानिपत पोलिसांनी (Panipat Police) तातडीने कारवाई करत अवघ्या 30 तासांत अपहरणाच्या कटाचा उलगडा केला. सीआयए-2 (CIA-2) पथकाने चार आरोपींना अटक केली, पण या गुन्ह्याची मास्टरमाइंड असलेली युवकाची प्रेयसी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

डीएसपी (DSP) सतीश वत्स यांनी सांगितले की, “मंगळवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास सिवाह गावातील एका हॉटेलमध्ये युवक-युवती थांबले असताना, चार जणांनी स्कॉर्पियो गाडीतून येऊन त्यांचे अपहरण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली.” एसपी (SP) लोकेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयए-2 पथकाने चारही आरोपींना अटक केली. (Love Trap)

प्रेयसीच निघाली मास्टरमाइंड

सतीश वत्स पुढे म्हणाले, “तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलगीच या सगळ्या योजनेची मास्टरमाइंड निघाली. तिने चार साथीदारांसोबत मिळून युवकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते.” फरार प्रेयसीचा शोध सुरू असून तिला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

 Title : Love Trap Youth Kidnapped 20 Lakh Ransom Demanded 

 

Join WhatsApp Group

Join Now