सब पैसों का खेल है बाबू भैय्या! मुंबईत ऐन निवडणुकीच्या काळात 4 कोटी 70 लाख जप्त

On: May 8, 2024 5:25 PM
Lok Sabha Elections Cash Worth 4 Crore 70 Lakh Seized by Powai Mumbai Police  
---Advertisement---

Lok Sabha Elections | लोकसभा निवडणुकीमुळे देशासह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. कालच लोकसभेच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. यामध्ये राज्यातील बऱ्याच ठिकाणी मतदान झालं. अशात मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबईमध्ये नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एक एटीएम कॅश व्हॅन पकडली असून या गाडीमधून तब्बल 4 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती.

मुंबईत नाकाबंदीदरम्यान रोकड जप्त

या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन गाडी जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली. चौकशीमध्ये पोलिसांनी 4 कोटी 70 लाख रुपये कॅश व्हॅन मधून जप्त केले. नंतर याबाबत आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयाला कळवण्यात आलं.

सदरील माहिती मिळाल्यानंतर निवडणूक (Lok Sabha Elections)अधिकाऱ्यांनी त्या कॅशचा बारकोड स्कॅन केला. यात बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने ही कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेतली आहे. आता ही रोकड कुठून आली आणि ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता?, याबाबत आता आयकर विभाग तपास करत आहे.

पवई पोलिसांकडून मोठी कारवाई

एकीकडे निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरु असताना पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यात मुंबईमध्ये हा प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या, सायन, घाटकोपर आणि भांडुप या भागातही पैशाने भरलेली व्हॅन जप्त करण्यात आली होती. आज पुन्हा हे प्रकरण समोर आलं आहे.

पोलिसांनी सायनमध्ये 1 कोटी 87 लाख 80 हजार , भांडुपमध्ये 3 कोटी 93 लाख रुपयांहून अधिक संशयित रक्कम जप्त करत कारवाई केली होती. याशिवाय, घाटकोपरमध्ये 72 लाखांची रोख रक्कम सापडली होती. आता पवईमध्ये थेट 4 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

News Title – Lok Sabha Elections Cash Worth 4 Crore 70 Lakh Seized by Powai Mumbai Police  

महत्त्वाच्या बातम्या-

शाॅरमा आवडीने खात असाल तर आत्ताच व्हा सावध; 19 वर्षीय तरुणाने गमावला जीव

‘आगामी काळात…’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

T20 World Cup बाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी!

“शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ

प्रेग्नंट दीपिका अन् रणवीरच्या संसारात वादळ?, घेतला मोठा निर्णय

Join WhatsApp Group

Join Now