LIC Jeevan Shiromani | फक्त चार वर्षे प्रीमियम भरून एक कोटी रुपयांचा विमा लाभ मिळवण्याची संधी देणारी LIC ची ‘जीवन शिरोमणी योजना’ उच्च उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी खास तयार करण्यात आली आहे. ही योजना विमा संरक्षणासोबतच बचतीचा देखील मजबूत पर्याय ठरते. (LIC Jeevan Shiromani )
4 वर्षे प्रीमियम, 1 कोटींचा विमा
एलआयसीची जीवन शिरोमणी योजना ही नॉन-लिंक्ड, वैयक्तिक आणि सेव्हिंग-बेस्ड लाइफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकास किमान 1 कोटी रुपयांच्या विमा रकमेची हमी मिळते. कमाल विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आवश्यक आहे. पॉलिसी मुदतीनुसार कमाल वय 45 ते 55 वर्षांदरम्यान ठरवण्यात आले आहे.
या योजनेसाठी ग्राहकाला 4 वर्षांसाठी दरमहा सुमारे ₹94,000 इतका प्रीमियम भरावा लागतो. ही रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक अशा कोणत्याही स्वरूपात भरता येते. प्रीमियम भरल्यानंतर योजनेत मोठा विमा लाभ मिळतो, तसेच सुरक्षित गुंतवणुकीची हमीही मिळते.
पॉलिसी सुरू झाल्यानंतर एका वर्षानंतर आणि संपूर्ण प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीधारकाला काही अटींवर कर्ज मिळू शकते. हे कर्ज पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर आधारित असते आणि LIC ठरवलेल्या व्याजदरानुसार दिले जाते.
गंभीर आजार, मृत्यू लाभ
या योजनेत एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे, जर पॉलिसीधारकाला कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाले, तर त्याला विम्याच्या रकमेच्या 10% इतकी रक्कम एकरकमी स्वरूपात मिळते. याशिवाय, पॉलिसीधारकाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक लाभही मिळतो.
एलआयसीच्या जीवन शिरोमणी योजनेमुळे उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मिळतो. चार वर्षे प्रीमियम भरल्यावर, भविष्यात मोठा विमा लाभ, सुरक्षितता आणि संभाव्य परतावा मिळतो. ही योजना केवळ विमा संरक्षणच देत नाही, तर भविष्याच्या आर्थिक गरजांसाठी एक मजबूत आर्थिक कवचही सिद्ध होते.
या योजनेबाबत अधिक माहिती LIC च्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर उपलब्ध आहे.
English Title : LIC Jeevan Shiromani 1 Cr Return in 4 Years






