स्वरसम्राज्ञी आशाताई अनंतात विलीन! चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्व शोकाकुल

On: April 13, 2026 5:57 PM
Asha Bhosle
---Advertisement---

Asha Bhosle | भारतीय संगीतसृष्टीतील महान गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना अखेरचा निरोप देताना संपूर्ण देश भावूक झाला. मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो चाहत्यांनी आणि मान्यवरांनी अश्रूंनी निरोप दिला.

अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राज ठाकरे (Raj Thackeray), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), तसेच संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांसह अनेक राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार :

आशा भोसले (Asha Bhosle) यांचे 12 एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, जिथे हजारो चाहत्यांनी त्यांचे शेवटचे दर्शन घेतले.

यानंतर अंत्ययात्रेदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. शिवाजी पार्क येथे शासकीय सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गायली. मराठी, हिंदी, बंगालीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गायकीचा ठसा उमटवला.

त्यांच्या बहिणी लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी संगीत क्षेत्रात मोठा वारसा निर्माण केला. तसेच संगीतकार R. D. Burman यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.

Asha Bhosle | शेवटपर्यंत सक्रिय :

वयाच्या नव्वदीतही अशा भोसले अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होत्या. मात्र, काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीसह संपूर्ण देशाला कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

News Title: Legendary Singer Asha Bhosle Laid to Rest with State Honours in Mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now