यादी तयार! रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 मोठे नेते पाडणार; कोणी दिला इशारा?

On: October 2, 2024 11:48 AM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच आता राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कारण सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन प्रचंड वातावरण तापलं आहे. कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार, राजेश टोपेंसह अन्य 50 नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

ओबीसींना आरक्षणाची गरज :

निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्यातील नेत्यांना थेट इशारा दिला आहे. ज्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना पोसलं आहे तसेच त्यांच्या आंदोलनाला देखील रसद दिली आणि ओबीसी समाजाचं आरक्षण पळवण्याच्या प्रयत्न केला अशा राज्यातील तब्बल 50 उमेदवारांना पाडण्याची आमची यादी तयार असल्याच रोखठोक मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केल आहे.

राज्यातील ओबीसी समाजाला अजूनही आरक्षणाची गरज आहे. तसेच सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी देखील समोर यावे. याशिवाय विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केल आहे.

Maharashtra l रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार पाडणार :

आम्ही राज्यातील 50 उमेदवार पडण्याची यादी देखील तयार केली आहे. तसेच राज्यात विधानसभेला 50 उमेदवार निवडून आणण्याची यादी आम्ही लवकरच तयार करु असे हाके म्हणाले आहेत. कारण ओबीसी मतांची भीती कधी वाटणार आहे. विदर्भातील ओबीसी नेतृत्वाला दुय्यम दर्जाची वागणूक सध्या राज्यातून मिळत आहे. तसेच ओबीसींनी यांच्या तुकड्यावर जगू नये . कारण 50 ते 60 टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींची भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला कधी बसेल? असा सवाल देखील हाकेंनी उपस्थित केला आहे.

यासह आम्ही राज्यातील 50 उमेदवार कोणते पाडायचे हे देखील ठरलं आहे. यामध्ये रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे अजून 50 मोठे उमेदवार आम्ही पाडणार आहोत. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण कार्यकर्ते येत्या विधानसभेत दिसणार आहेत. त्यामुळे लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणार आहे असे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

News Title –

laxman hake aginst on rohit pawar & rajesh tope

महत्वाच्या बातम्या-

‘या’ बड्या नेत्याला घेण्यासाठी जाताना कोसळलं हेलिकॉप्टर; तीन जणांचा मृत्यू

ब्रेकिंग! पुण्यातील ‘या’ भागात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

“साईबाबा मुस्लिम, त्यांचा हिंदू धर्माशी संबंध नाही”; वाराणसीतील मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

विमानात जशा ‘हवाई सुंदरी’ तशाच आता ST बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now