लॅम्बोर्गिनीचा थरार! फुटपाथवरील मजुरांना चिरडलं, नंतर ड्रायव्हर म्हणाला, “कोणी मेलं आहे का?”

On: March 31, 2025 10:35 AM
Lamborghini Accident in Noida 
---Advertisement---

Lamborghini Accident | नोएडामधील सेक्टर-94 भागात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. भरधाव लॅम्बोर्गिनी कारनं फुटपाथवर बसलेल्या मजुरांवर धडक दिली. अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले असून, लोकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा ड्रायव्हरचं वागणं संतापजनक ठरलं.

लॅम्बोर्गिनी चढली फूटपाथवर, मजुरांचा थरकाप

नोएडाच्या (Noida) सेक्टर-126 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरखा फेरी परिसरात रविदास आणि रंभू कुमार हे दोन कामगार फूटपाथवर बसले होते. अचानक भरधाव लॅम्बोर्गिनी गाडीने (Lamborghini) फूटपाथवर घुसून त्यांना धडक दिली.

अपघातानंतर गाडी जवळील झाडावर आदळली. जखमी झालेल्या मजुरांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. यावेळी स्थानिकांनी गाडीच्या दिशेनं धाव घेतली असता, चालक कारमधून म्हणाला, “कोणी मेलं आहे का?” हे ऐकून संतप्त जमावाने त्याला घेरले.

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दीपक कुमार या आरोपी चालकाला ताब्यात घेतले. तो राजस्थानातील अजमेरचा रहिवासी आहे. दीपकने सांगितले की, तो एक कार दलाल असून, लक्झरी गाड्यांची खरेदी-विक्री करतो. ही कार त्याची नसून सुपरनोव्हा येथील मृदुल नावाच्या व्यक्तीची आहे आणि तो केवळ टेस्ट ड्राईव्ह करत होता.

कार दलालाचा दावा – टेस्ट ड्राईव्हमध्ये अपघात

दीपक कुमारने अधिकाऱ्यांना सांगितलं की, गाडीची स्क्रीन तपासताना त्याला काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यासाठीच त्यानं गाडी रस्त्यावर चालवली आणि त्यावेळी थोडं एक्सेलरेट करताच गाडी नियंत्रणाबाहेर गेली. त्याने हलकं एक्सिलरेट केलं होतं, पण गाडी अचानक वेगाने पुढे गेली आणि अपघात घडला. पोलिसांनी लॅम्बोर्गिनी कार जप्त केली असून, आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Title : Lamborghini Accident in Noida 

 

Join WhatsApp Group

Join Now